साधारण २ वर्षांपूर्वी मोगर्याच रोपट घरी आणलं होतं. त्यावेळी त्याला भरघोस कळ्या आल्या होत्या त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाल कींवा गृहित धरल की आपसूकच फूलं येतील. (विसरले होते की सदाफुली नसुन मोगरा आहे). जेवढ्या चूका करता येतील तेवढ्या मोगर्याच्या बाबतीत केल्या आहेत.२ वर्ष मोगर्याला एकही फूलं आलं नाही. ह्या वर्षी मात्र डोळ्यात तेल घालून काळजी घेतली आणि त्यामुळेच कदाचित ह्या वर्षी मोगर्याच दर्शन झालं. आणि खरच वाटलं की मोगर्याच्या सुगंधापुढे त्याची एवढी काळजी घेणं worth आहे.
मोगर्याला दुर्लक्ष केलेलं बिलकूल सहन होत नाही. वर्षभर मोगर्याची काळजी घ्यावी लागते. नियमितपणे मोगर्याची पान check करत रहावी. पानं दुमडलेली दिसली की किटकनाशकाचा spray करावा. मोगर्याच्या बहराच्या काळात दर ७ दिवसांनी खत द्यावे, व इतर वेळी १५-२० दिवसांनी द्यावे. उत्तम सुर्यप्रकाश आणि नियमितपणे पाणी द्यावे. माती कोरडी रहायला नको. मोगरा ज्या कुंडीत लावला आहे त्या कुंडीत आणखी एखाद रोपट लावल तर मोगरा अधिक बहरतो. वरील २-३ इंच माती दर २०-२५ दिवसांनी उकरत रहावी.
एवढी सगळी काळजी घेऊन फुललेला मोगरा बघुन आनंद द्विगुणित होतो. आणि मोगर्याच्या सुगंधाला तर तोडच नाही.