Ha Gandh Fulancha (हा गंध फूलांचा): About Me

About Me

बी पासुन रोपट/झाड मोठ होताना बघण्यात जे सुख आहे ते
कशातही नाही.

आपण आपल्यासाठी एक असा छंद शोधत असतो जो
आपल्याला त्यात हरखुन देईल.असाच एक छंद माझाही आहे.
मी माझा छंद कोणाला न सांगताही जोपासु शकते.बरोबर ना?
मग हा ब्लॉग का?प्रत्येकाच्या घरी चार तरी झाडं असावी
असे माझे मत आहे. ज्याला बागकामाचा गंधही नाही त्यालाही
हा  ब्लॉग वाचुन आवड निर्माण व्हावी अशी इच्छा आहे.


प्रोफेशनने स्थापत्य अभियांत्रिकी (civil engineer),
कॅलिग्राफीची आवड जपणारी, ज्योतिष अभ्यासक,
आणि बागकामाचा छंद असणारी 'मी'.


थोडस हया ब्लॉग बद्दल.....
एकदा बागकामाबद्दलचा  video  बघताना अचानक मनात
कल्पना आली, आपण का हे करू नये ?
तशी मला आधीपीसुन फूल झाडांची आवड आहे
( कोणाला नसते म्हणा!)
मग लागले कामाला......
पण मग balcony garden तयार करताना असा विचार आला,
आपण ह्याबद्दल आपला अनुभव का सांगु नये ?
म्हणून हा ब्लॉग "हा गंध फूलांचा"
तर, ह्या ब्लॉगमध्ये मी माझा balcony garden चा
अनुभव सांगणार आहे.


आशा करते की माझा अनुभव तुम्हाला वाचण्यायोग्य वाटेल.


आणि एका सुज्ञ व्यक्तिने सांगीतलचं आहे,
"Plant your own garden.
Instead of waiting for someone to bring you
flowers "😉


जास्वंद 






No comments:

Post a Comment