Ha Gandh Fulancha (हा गंध फूलांचा): March 2020

Saturday, March 28, 2020

बाटलीतलं झाडं -भाग 2 (hanging pots)

फ्लॅट सिस्टिममध्ये दोन पद्धतीच्या बागकामाला वाव असतो, Balcony gardening आणि Window gardening. त्यामध्येही प्रामुख्याने window gardening मध्ये कुंड्या ठेवायला अतिशय कमी जागा असते. Hanging pots हा प्रकार कमीत कमी जागा व्यापतो. (ही कल्पना मला सुचलेली नसून मी एका व्हिडीओ मध्ये बघितलेली आहे)

तर, ह्यात वापरात नसलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कुंड्या म्हणून केला जातो व नंतर या बाटल्या किंवा कुंड्या grill ला hooks च्या सहाय्याने अडकवल्या जातात म्हणजेच कमीत कमी जागेत आणि खर्चातील कुंड्या. परंतु, D.I.Y( do it yourself ) प्रकारात मोडत असल्याने ह्या कुंड्या बनवायला जरासा वेळ लागतो. जो सध्या Quarantine च्या कृपेने किंवा अवकृपेने भरपूर आहे.
ह्यामध्ये लागणारे साहित्य म्हणजे प्लास्टिकची  बाटली, सुरी, कात्री किंवा कोणतीही अणुकूचीदार, धारदार वस्तू, सुतळ आणि hooks.

एखादी वापरत नसलेली प्लास्टिकची बाटली आडवी ठेवून तिची वरील बाजू आयताकृती भागात कापून घ्यावी. तो होईल कुंडीचा सरफेस एरिया (surface area). कापलेल्या आयताकृती भागाच्या दोन्ही बाजूस दोन छिद्र पाडावे ( सुरी किंवा कात्रीच्या सहाय्याने) मग त्याच्या विरुद्ध बाजूस दोन छिद्र पाडावे (पाण्याचा निचरा होण्यासाठी) आता वरील बाजूस जे छिद्र आहेत त्यामधून सुतळ टाकावी ही कुंडी तयार झाली. आता तयार झालेल्या कुंडीत माती घालून हवं ते रोपट/झाड लावून ग्रीलला hooks च्या साहाय्याने अडकावे

जेव्हा आपण ही कुंडी ग्रीलला अडकवतो तेव्हा या कुंडीचं किंवा बाटलीच वजन कमीत कमी ठेवण्यासाठी माती बरोबर perlite आणि cocopeat चा वापर करावा.

Saturday, March 21, 2020

बाटलीतील झाडं (Easy to grow)


घरी कमी जागा असल्यामुळे, वेळ नसल्यामुळे बर्‍याचदा आवड असुनही आपल्याला झाडं लावता येत नाहीत. परंतु, झाडं कुंडीतच लावली पाहिजे हे गरजेचे नाही. बाटलीमध्येही आपण झाडं लावु शकतो. वापरात नसलेल्या बाटलीमध्ये (किंवा ग्लासात) पाणी घालुन त्यात आवडत्या झाडाची/ रोपट्याची फांदी कापून ठेवावी. मात्र, झाडाची जशी वाढ कींवा जसा बहर आपल्याला मातीत असलेल्या रोपट्याला मिळेल तसाच पाण्यात ठेवलेल्या रोपट्याला नाही मिळणार. परंतु, काही नसण्यापेक्षा काहीतरी असणं कधीही चांगल.
शहरातल्या लोकांना, किंवा ज्यांच जीवन घड्याळ्याच्या काट्यावर चालत, ज्यांना झाडांची निगा राखायचा वेळ नाही. त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.
ह्यामध्ये करायच फक्त हेच आहे की आवडलेल्या झाडाची/रोपट्याची फांदी ४५° मध्ये कापायची. फांदी कापताना धारदार सुरीचा / कात्रीचा वापर करावा. परंतु, फांदी नक्की कुठे कापावी ?
नोड ( Node) च्या लगेच खाली कींवा दोन नोडच्या  मध्यभागी ४५° मध्ये फांदी कापावी. कापलेली फांदी लगेच पाण्यात ठेवावी. फांदी बाटली कींवा ग्लासात ठेवताना अगदी तळाशी लागु देउ नये. किमान २-३ इंच अंतर ठेवावे.
एकदा मुळं आली की दर १५-२० दिवसांनी पाणी बदलत रहावे. ह्यांना खताची आवश्यकता नाही. परंतु, तरिही पानं टवटवीत दिसण्यासाठी liquid खताचा (seaweed fertilizer) फवारा दर २०-२५ दिवसांनी मारावा. ही बाटलीतील झाडं कुठेही राहु (table , desk, teapoy) शकतात व कुठेही ठेवुन त्या जागेची शोभा वाढवतात.
Pothos म्हणजेच मनी प्लांट सर्वात पटकन व सहजरीत्या पाण्यात वाढते.
तर, अशी ही सहज, सरळ, सोप्प्या पध्दतीने लावता येणारी "बाटलीतील झाडं"

जर इच्छा असेल तर आपण ह्या फांद्या एखाद्या कुंडीतही लावु शकतो.

Node - झाडाचा असा भाग जिथे पानं येतात



                                   


 




Saturday, March 14, 2020

कडीपत्ता (Curry leaves- Easy to grow tropical plant )

घराघरात दररोज लागणारी गोष्ट म्हणजे कडीपत्ता.हाच कडीपत्ता आपल्याला घरातुनही मिळू शकतो.

आपण तीन पध्दतीने कडीपत्ता लावू शकतो.
१. कडीपत्त्याच्या बियांपासुन कडीपत्ता लावणे. परंतु ह्या प्रक्रियेला (process) खुप वेळ लागतो.
२. कडीपत्त्याच्या फांदीपासुन ( ४५° मध्ये कापुन). कडीपत्त्याची फांदी कुंडीत लावावी. नवीन पालवी फुटेपर्यंत कींवा रोपट थोड मोठं होइपर्यंत त्याला अशा जागी ठेवावे जेथे थेट सूर्यप्रकाश नसेल व माती नेहेमी ओली (moist) ठेवावी. एकदा रोपट मोठ झाल्यावर त्याला मोठ्या कुंडीमध्ये लावुन अशा जागी ठेवावे जेथे भरपुर व थेट सूर्यप्रकाश मिळेल.
३. सर्वात सोप्पा पर्याय म्हणजे नर्सरी मधुन कडीपत्त्याच रोपटं विकत आणणे.

कडीपत्ता ही उष्णकटीबंधीय वनस्पती (tropical plant) आहे. त्यामुळे त्याला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. कडीपत्त्याला well drain माती म्हणजेच पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि mild acidic माती लागते.

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कडीपत्त्याला रोज पाणी देण्याची गरज नाही. १-२ दिवसातुन एकदा पाणी द्यावे कींवा माती कोरडी झाल्यावर पाणी द्यावे. उन्हाळ्यात मात्र रोज पाणी द्यावे.
कडीपत्त्याला १० दिवसातुन एकदा खत दयावे.
ताक पाण्यात एकत्र करून (७५% पाणी २५% ताक ) दर १० दिवसातुन एकदा दयावे. ताक दिल्याने पानांची चांगली वाढ होते व नविन पालवी फुटते.

कडीपत्ता २० फूट उंच वाढु शकतो. त्याची वर्षातुन एकदा कींवा दोनदा काटछाट( pruning) करावी. म्हणजेच त्यांच्या कशाही वाढलेल्या फांद्या कापाव्या. त्यामुळे कडीपत्त्याला चांगला आकार मिळतो आणि वाढीस मदतही मिळते.

कडीपत्त्याला बुरशीचा (black spot fungus) प्रार्दुभाव होतो. त्यांच्या पानांच्या मागील बाजुस काळे डाग येतात.दर ७ दिवसातुन एकदा नियमितपणे कडुनींबाच्या तेलाचा फवारा मारावा (neem oil spray).
ज्या पानांना बुरशीचा जास्त प्रार्दुभाव झाला असेल ती पाने काढुन टाकावी व झाडाला कडुनींबाच्या तेलाचा फवारा मारावा. बुरशी पुर्णतः जाइपर्यंत दर २-३ दिवसातुन एकदा neem oil spray मारावा.

ज्याच्याशीवाय फोडणी/ तडका अपूर्ण आहे असा  हा कडीपत्ता सहजरीत्या आपल्याला सेंद्रिय खतापासुन घरच्या घरी मिळू शकतो.

कडीपत्ता





Saturday, March 7, 2020

Pudina (पुदीना)- a plant to start kitchen gardening

एका संध्याकाळी बाल्कनीमध्ये चहा पीत असताना अचानक विचार आला.
आपण का म्हणून balcony/kitchen garden सुरु करु नये ?
पण ज्या गोष्टीत आपल्याला शुन्य अनुभव किंवा  माहिती आहे
त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ?
मग videos बघुन, blogs आणि पूस्तकं वाचून 
प्राथमिक माहिती मिळाली.
पण जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत पूस्तकी ज्ञान (therotical knowledge)  उपयोगी नाही.
तर, शेवटी पुदीना लावायच ठरलं
पण पुदीनाच का?
ज्यांना बागकामामधला काही अनुभव नाही ते ही पुदीना लावुन, जगवुन वाढवु शकतात म्हणुन.

फक्त पुदीना लावताना घ्यावयाची काळजी ही की,
त्यांना सुर्यप्रकाशाची गरज असते पण उन्हाळ्यात ज्या वेळेस सुर्याची प्रखरता खुप असते तेव्हा मात्र त्यांना थोड्या आडोश्याच्या जागी ठेवावे.पुदीन्याला खत दिले नाही तरी चालण्यासारखे आहे परंतु १५ दिवसांमधुन एकदा खत दयावे.

पुदीना लावण्याच्या दोन पध्दती आहेत.
१.पुदीन्याच्या काड्या ४५° मध्ये कापुन (जिथे पानं येतात त्याच्यावर) सरळ एका ग्लासात पाणी घालुन ठेवाव्या, दर ७-८ दिवसांनी पाणी बदलावे.
२. ४५° मध्ये कापलेल्या काड्या एका कुंडीत लावाव्या. साधारणतः १०-१५ दिवसात नवीन पानं यायला सुरुवात होते.

आपण लावलेल्या रोपाला/झाडाला जेव्हा नवीन पालवी फुटते/नवीन पानं येतात; ते बघण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कशात नाही.




  पुदीना 

Pudina cuttings in jute bag
         New Leaves- पालवी 


























Sunday, March 1, 2020

Succulents & hoya (सक्युलेंट्स आणि होया)

मला succulents हा प्रकार फार प्रीय आहे.
एक तर त्यांना पाण्याची जास्त गरज लागत नाही. म्हणजेच, रोज पाणी घालण्याची चिंता नाही.आणि दूसर म्हणजे ते इतके गोंडस असतात की ते घराच्या कुठल्याही कोपऱ्यात  ठेवल्यावर घराची शोभा वाढवतात.

तर, succulents म्हणजे नक्की काय ? 
succulents हा झाडांचा असा वर्ग आहे ज्यांना भरपुर सुर्यप्रकाश आणि खुप कमी पाण्याची आवश्यकता असते. प्रामुख्याने वाळवंटात व कमी पाण्याच्या प्रदेशात हे बघायला मिळतात.

बरेचसे Succulents हे hoya मध्येही बघायला मिळतात. म्हणजेच त्यांच्या खोड/पानांमध्ये पाणी साठवुन ठेवण्याची क्षमता असते. परंतु, सगळेच hoya हे succulents ह्या र्वगात येत नाही.
(https://succulent-plant.com/families/apocynaceae/asclepiadaceae/hoya.html)

हया वर्गातील झाडांचे खोड वा पानं जाड असतात.ते पाणी साठवुन ठेवण्याचे काम करतात.
आधी सांगीतल्याप्रमाणे ह्यांना पाण्याची कमी गरज लागते‌ त्यामुळे माती पुर्ण कोरडी झाल्यावरच पाणी घालावे (साधारणतः ५-६ दिवसातुन एकदा पाणी घालावे) व अशा जागी ठेवावे जिथे भरपुर आणि थेट सुर्यप्रकाश (direct sunlight) मिळेल.१५-२० दिवसातुन एकदा खत दयावे.

ह्या झाडांची काळजी घेण अगदी सोप्प आहे. त्यामुळे ज्यांना झाडांची आवड आहे पण त्यांची निगा राखण्याचा ‌वेळ नाही त्यांच्यासाठी succulents हा उत्तम पर्याय आहे.


     Succulents (सक्युलेंट्स)



      Succulents (सक्युलेंट्स)

               Hoya (होया)