घरी कमी जागा असल्यामुळे, वेळ नसल्यामुळे बर्याचदा आवड असुनही आपल्याला झाडं लावता येत नाहीत. परंतु, झाडं कुंडीतच लावली पाहिजे हे गरजेचे नाही. बाटलीमध्येही आपण झाडं लावु शकतो. वापरात नसलेल्या बाटलीमध्ये (किंवा ग्लासात) पाणी घालुन त्यात आवडत्या झाडाची/ रोपट्याची फांदी कापून ठेवावी. मात्र, झाडाची जशी वाढ कींवा जसा बहर आपल्याला मातीत असलेल्या रोपट्याला मिळेल तसाच पाण्यात ठेवलेल्या रोपट्याला नाही मिळणार. परंतु, काही नसण्यापेक्षा काहीतरी असणं कधीही चांगल.
शहरातल्या लोकांना, किंवा ज्यांच जीवन घड्याळ्याच्या काट्यावर चालत, ज्यांना झाडांची निगा राखायचा वेळ नाही. त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.
ह्यामध्ये करायच फक्त हेच आहे की आवडलेल्या झाडाची/रोपट्याची फांदी ४५° मध्ये कापायची. फांदी कापताना धारदार सुरीचा / कात्रीचा वापर करावा. परंतु, फांदी नक्की कुठे कापावी ?
नोड ( Node) च्या लगेच खाली कींवा दोन नोडच्या मध्यभागी ४५° मध्ये फांदी कापावी. कापलेली फांदी लगेच पाण्यात ठेवावी. फांदी बाटली कींवा ग्लासात ठेवताना अगदी तळाशी लागु देउ नये. किमान २-३ इंच अंतर ठेवावे.
एकदा मुळं आली की दर १५-२० दिवसांनी पाणी बदलत रहावे. ह्यांना खताची आवश्यकता नाही. परंतु, तरिही पानं टवटवीत दिसण्यासाठी liquid खताचा (seaweed fertilizer) फवारा दर २०-२५ दिवसांनी मारावा. ही बाटलीतील झाडं कुठेही राहु (table , desk, teapoy) शकतात व कुठेही ठेवुन त्या जागेची शोभा वाढवतात.
Pothos म्हणजेच मनी प्लांट सर्वात पटकन व सहजरीत्या पाण्यात वाढते.
Pothos म्हणजेच मनी प्लांट सर्वात पटकन व सहजरीत्या पाण्यात वाढते.
तर, अशी ही सहज, सरळ, सोप्प्या पध्दतीने लावता येणारी "बाटलीतील झाडं"
जर इच्छा असेल तर आपण ह्या फांद्या एखाद्या कुंडीतही लावु शकतो.


No comments:
Post a Comment