बागकामाची किंवा झाडांची कुणाला आवड असो वा नसो परंतु फुलझाडं किंवा फुलांची आवड नसणाऱ्या व्यक्ती तुरळकच.
फुलांचे विविध प्रकार आहेत.काही फुले फक्त शोभेची असतात तर काहींचा गंध अगदी सुरेख असतो, काहींचा उपयोग खाण्यासाठी केला जातो तर काहींचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
फुलं कोणत्याही प्रकारची असो ते आपलं मन प्रसन्न करण्याच काम नक्कीच करतात.
सकाळी उठल्या उठल्या जर आपल्याला उमललेले फूल दिसलं तर दिवसाची सुरुवात नक्कीच चांगली होते. Quarantine च्या काळात जेव्हा घरी राहुन कंटाळा आलेला आहे तेव्हा ही गोष्ट नक्कीच जाणवते, ह्यांना फुलताना किंवा उमलताना बघून मनाची मरगळ काही अंशी तरी नक्कीच कमी होते.
जर एखाद्या फुलझाडाची सुरुवात आपण बी पासून केली असेल आणि फुलं उमलण्याची वाट आपण महिनोन महिने बघितली असेल तेव्हा ते फूल उमलताना बघण्यात जे सुख आहे ते कशातच नाही.
त्यामुळेच कुणाला बागकामाची आवड नसली तरी घरी एक तरी फुलझाड किंवा तुळस असायलाच हवी. झाडांची काळजी ही प्रत्येक फूलागणीक बदलते. परंतु, चांगला बहर येण्यासाठी calcium water १५-२० दिवसातून एकदा द्यावे आणि त्यांच्या मातीमध्ये egg shells एकत्र करावे. फुलझाडांची काटछाट (pruning) सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.
गोकर्ण सर्वात सोप्प फुल आहे म्हणजे त्याची तितकीशी काळजी घ्यावी लागत नाही आणि ह्याच उलट जास्वंद, मोगरा, गुलाब यांची बर्यापैकी काळजी घ्यावी लागते.
ही बहुरंगी, बहुढंगी फुल प्रत्येकालाच एक सुखद आनंद देऊन जातात
No comments:
Post a Comment