झाडांची जास्त चांगली वाढ होण्यासाठी आपण खत वापरतो. मी अगदी सर्व प्रकारची खतं वापरून बघितली आहेत. (Liquid fertilizers to solid fertilizers, bioenzymes, etc) परंतु, जो result झाडांना जीवामृत देऊन मिळाला आहे त्याची तुलना बाकी कशाची होऊ शकत नाही. जीवामृत मुख्यत्वे गोमातेच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनवल जातं. बऱ्याच लेखांमध्ये आणि व्हिडीओज मध्ये मी याबद्दल वाचलं आणि ऐकलं होतं. त्यामुळे, एकदा प्रयत्न करून बघाव असं ठरवलं. पण देशी गायीच ताजं शेण मिळणं हे खूप महत्प्रयासाने शक्य झालं.( गोमूत्र शीळ वापरु शकतो मात्र शेण ताजच हव). जीवामृत बनवण्याची पद्धत आणि त्याचे मोजमाप हे तंतोतंत पाळले गेले पाहिजे (तो एक प्रकारचा संस्कारच म्हणावा लागेल) महिन्यातून दोनदा जीवामृत देणे कुंड्यांमधील झाडांसाठी पूरक आहे.
जीवामृत is game changer for me. जीवामृताशिवाय झाडं वाढवण्याचा विचारही करू शकत नाही. जीवामृताचा उपयोग फक्त खत म्हणून नाहीतर कीटकनाशक म्हणूनही होतो. गोमूत्र पाण्यात मिसळून त्याचा फवारा झाडांवर मारला तर झाडांना लागणाऱ्या रोगांच प्रमाण कमी होतं. जीवामृत नियमितपणे वापरल्यास फुले येण्यामध्ये वाढ होते, झाडांची वाढ झपाट्याने होते आणि झाडांची रोगांपासून लढण्याची ताकदही वाढते.
आपल्याकडे किती झाड आहेत याचा अंदाज घेऊन जीवामृत बनवाव लागत. जीवामृतात मुख्यत्वे ताजे शेण, गोमूत्र, माती, गुळ, चण्याच्या डाळीचे पीठ हे पदार्थ जातात. त्यांच्या प्रमाणाबद्दलची माहिती सहज कोणत्याही जाणकारांच्या लेखात आणि व्हिडिओमध्ये मिळेल.
जर जीवामृत बनवण्याचा वेळ नसेल तर घनजीवामृत ही बनवू शकतो. ज्याचा वापरण्याचा कालावधी सहा महिने आहे. जीवामृत शक्यतो दहा दिवसांमध्ये वापरून संपवावे लागते.
ज्यांच्याकडे झाडं आहेत कींवा झाड लावायची वाढवायची आवड आहे त्यांनी किमान एकदा तरी जीवामृत वापरून बघावे.
नमन त्या गोमातेला जिच्यामुळे मी झाडांना जीवामृत देऊ शकते !!!
No comments:
Post a Comment