बागकामासाठी साहित्य, वस्तूंची खरेदी करणे (कुंडी, माती, रोपटी, खत) हे कपडे खरेदी करण्यासारख आहे. जेवढ्या वस्तू घ्याव्या तेवढ्या कमीच. त्यामुळे कुठेतरी बजेट ठरवावं लागतं. आणि हा खर्च काही अंशी कमी करण्यासाठी पर्यायी साधनं/ वस्तू आपल्या घरीच उपलब्ध असतात.
"चहा पावडर" हा अनेक पर्यायांपैकी एक पर्याय आहे
चहा पावडर ही चहाबाज/चहाप्रेमी लोकांच्या मूलभूत गरजांमधली एक गरज आहे. (अन्न-वस्त्र-निवारा-चहा). परंतु हा चहा बनवून झाल्यावर ती चहा पावडर कचरापेटीचं धन होते. त्याऐवजी हीच टाकाऊ चहापावडर आपण बागकामात झाडांचा खाऊ /खत म्हणून वापरू शकतो. चहा पावडर हे खूप slow आणि mild fertilizer आहे. त्यामुळे आपण हे ३-४ दिवसांमधून एकदा एका कुंडीत वापरू शकतो. चहा पावडर मध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे झाडाच्या वाढीला मदत मिळते, ज्या झाडांना फळे-फुले येत नाही (foliage plant) त्यांच्यासाठी चहा पावडर हा खत म्हणून उत्तम पर्याय आहे.
चहा बनवून झाल्यावर जी चहा पावडर उरते ती दोनदा धुवून घ्यावी व लगेच कुंडीत घालावी. जर लगेच कुंडीत घालायची नसल्यास ती चहा पावडर उन्हात सुकवून डब्यात साठवून ठेवावी.
दिवसातून ५-६ वेळा चहा पिऊन झाल्यावर ती चहा पावडर कचरापेटीत टाकताना कुठेतरी चरररर् व्हायचं पण आता नक्कीच मी माझ्या चहाला पूर्ण न्याय देते असं वाटतं 🤪
No comments:
Post a Comment