बाल्कनी गार्डन किंवा किचनच्या खिडकीजवळ म्हणजेच कमी जागेत लावण्यासाठी परिपूर्ण अशी गोष्ट म्हणजे microgreens (मायक्रोग्रींन्स). सर्वात सोप्पे, जलद आणि तेवढेच पोषकही.
Microgreens म्हणजे नक्की काय ?
एखादा रोपट्याची आपण बीपासून सुरुवात करतो. जेव्हा बिला अंकुर फुटत त्याला Cotyledon म्हणतात (जो बीचा एक भाग असतो), त्यानंतर true leaves (रोपट्याला येणारी पहिली पानं) येतात. आणि एकदा true leaves आल्यानंतर जर आपण त्यांचा उपयोग खाण्यासाठी केला किंवा त्यांना harvest केलं तर त्यांना microgreens म्हणतात. microgreens दिसायलाही अगदी सुरेख असतात त्यामुळे microgreens मुख्यत्वे garnishing साठी, salads मध्ये अन्नाची पोषकता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.
Microgreens मध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील काही सोप्पे पर्याय म्हणजे मोहरी, पालक, मेथी, गाजर, कोथिंबीर, lettuce इत्यादी. ह्यांच्या बिया ४-५ इंच खोली असलेल्या मातीच्या भांड्यात किंवा ट्रेमध्ये दाटीवाटीने लावाव्या. प्रखर ऊन मिळणाऱ्या खिडकीजवळ हे भांड ठेवाव.आणि ७ - १४ दिवसांमध्ये microgreens कधीही हार्वेस्ट करावे. Cotyledon, true leaves आणि steam ह्या तिन्ही गोष्टींनी microgreens तयार होतात. ह्यात मुळांचा समावेश नसतो.
मोठ्या रोपट्याची छोटीशी प्रतिकृती म्हणजेच microgreens
No comments:
Post a Comment